– कुलर साफ करतांना करंट लागून अकरा वर्षीय बालकाचा मृत्यू
The गडविश्व
यवतमाळ : घरातील कुलर साफ करतांना करंट लागून अकरा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यातील सावर येथे घडली.
संकल्प ढवळे असे करंट लागून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.
कुलर सुरू असताना कुलरच्या टपातील बंद पडलेले चित्र संकल्प साफ करत होता यादरम्यान संकल्प ला विजेचा जोरदार झटका बसला यात संकल्प चा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर कुलर सुरू असतांना करंट लागून अशाप्रकारच्या घटना घडत असतात म्हणून कुरलचा वापर करतांना खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन महावितरण कडून वेळोवेळी करण्यात येते.