The गडविश्व
धानोरा : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा बि.एस .सी. भाग दोन चा विद्यार्थी साहिल सिताराम बडोदे याने अखील भारतीय आंतर विद्यापीठ स्तरीय मीनी गोल स्पर्धा राजस्थान विद्यापीठ जयपुर येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवून यश संपादन केले आहे.
त्याने या स्पर्धेत सहभाग घेऊन महाविद्यालयाचे नाव लौकीक केले आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा. संजय मुरकुटे, आई वडील, व इतर शिक्षकांना दिले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थाध्यक्ष, सचिव तसेच सर्व मान्यवरांनी आणि प्राचार्य प्राध्यापक तसेच शिक्षेकेत्तर कर्मचारी वृंदांनकडुन अभिनंदन केल्या जात आहे.