अहेरीत ज्वेलर्सच्या दुकानात चोरी : अवघ्या १२ तासात चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

475

– आरोपी ताब्यात
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील अहेरी येथील ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करणाऱ्या आरोपींच्या अवघ्या १२ तासात मुसक्या आवळण्यात अहेरी पोलीसांना यश आहे आहे. याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून चोरी गेलेला माल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अहेरी येथील कन्यका मंदिरासमारेर असलेल्या अमोल कविराजवार यांचे सोना चांदीचे दुकान आहे. १९ एप्रिल रोजी रात्रो ८ वाजताच्या सुमारास अमोल कविराजवार हे दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान २० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास दुकानात चोरी झाल्याची माहिती मिळाली. दुकानाचे शटर उघडे दिसून आले. दुकानात जावून पाहिले असता दुकानाच्या ड्रावरमधे ठेवलेली अर्धा किला मोडीची २५ हजार रूपये किंमतीची चांदी चोरटयांनी चोरी केल्याचे दिसून आले. लागलीच त्यांनी अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी दुकानातील सिसिटीवी फुटेज तपासले असता त्यांमध्ये एक बुरखाधारी महिला व दोन इसम तोंडाला रूमाल बांधून असलेले दिसत होते. दरम्यान पोलीसांनी गतीने तपासचक्र फिरविले असता शुटींगमधील एक इसम हा रेकार्डवरील आरोपी सद्याम फत्ते मोहम्मद शेख रा. आलापल्ली यांच्यासारखा दिसत असल्याच्या संशयावरून आलापल्ली येथे त्याला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल केले असता अधिक चौकशी केली व त्याच्यासोबत चंद्रपूर जिल्हयातील अब्दुल व बहाब उर्फ भोला शेख हसन रा. दुर्गापूर, जुमना अंताराम परते रा. आलापल्ली हे सोबत असल्याचे अघडकीस आले. यावरून पोलीसांनी याप्रकरणातील आरोपींच्या अवघ्या १२ तासात मुसक्या आवळत अटक करून त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत केला. अवघ्या १२ तासात प्रकरणाचा छडा लावल्याने अहेरी पोलीसांचे कौतुक केले जात आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण, पोलीस हवालदार सदानंद पाडी, पोलीस हवालदार शंकर डांगे, नापोशी विनोद रणदिवे, नापोशी मनोज कुमला, पोलीस शिपाई नाना सोमनपल्लीवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here