जेसीबीने वृध्द शेतकऱ्यास चिरडले

298

– नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
The गडविश्व
चिमूर : तालुक्यातील नवेगाव (जामगांव) येथे जेसीबीने शेतजमीनीचे सपाटीकरण सुरू असतांना चालकाचे जेसीबीवरील नियंत्रण सुटल्याने वृध्द शेतकऱ्यास चिरडल्याची घटना काल गुरूवार २१ एप्रिल रोजी घडली. सुर्यभान सखाराम सोनवने (७५) असे अपघाता ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुयर्भान सोनवने यांच्या जांभुळवहिरा येथील शेतजमीनीचे एमएच ४० पी. ३३२७ क्रमांकाच्या जेसीबीने सपाटीकरण करण्याचे काम सुरू होते. दरम्यान जेसीबी चालक रूपेश शामराव मुंगणे मु.नवतळा हा जेवण करत असतांना एका अनोळखी इसम उभी असलेली जेसीबी चालवायला लागला. यावेळी त्याचे जेसीबीवरील नियंत्रण सुटल्याने आपल्या शेताच्या धुऱ्यावर झाडाखाली बसलेले शेतकरी सुर्यभान सोनवणे यांच्यावर चढवल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. यामध्ये जेसीबीची पावडी सुर्यभान यांच्या डोक्याला लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी सोबत असलेला नातू मात्र थोडक्यात बचावला.
सदर घटनेची माहिती मिळताच भिसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन जंगम यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालया चिमूर येथे पाठविण्यात आले. पुढील तपास भिसी पोलीस करीत असून या घटनेतील आरोपी कोण ? अनोळखी चालक कोण ? अशी चर्चा परिसारात जोर धरू लागली आहे. पोलीस प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here