खळबळजनक : पुष्कर मेळाव्यात पोलीस कर्मचाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

1916

– पोलीस विभागात खळबळ
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथील प्राणहिता नदी किनारी १२ वर्षानंतर पुष्कर कुंभमेळा भरविण्यात आला आहे. या पुष्कर मेळा दरम्यान एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. किशोर नेवारे असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, १३ एप्रिल पासून सिरोंचा येथील प्राणहिता नदी किनारी पुष्कर मेळा चे आयोजन करण्यात आले आहे. या कुंभमेळात लाखोंच्या संख्येत भाविक उपस्थित होत असतात. यादरम्यान नियंत्रणाकरिता पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे बंदोबस्त सुरू असतांना काल रात्रो ९ वाजताच्या सुमारास सिरोंचा पोलीस ठाण्याचा शिपाई किशोर नेवारे हा शौचास स्मशानभूमी परिसरात नदी घाटावर गेला. त्याठिकाणी थोडाफार अंधार असल्याने नकळतपणे पाय घसरून तोल गेल्याने नदीच्या पाण्यात पडला दरम्यान त्याला पोहता येत नसल्याने व तो कोणाच्याही नजरेत न आल्याने अखेर त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रात्रोच्या सुमारास घडली. आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास पाण्यात मृतदेह पण्यात तरंगतांना दिसल्याने सदर घटना उगडकीस आली. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. मात्र काल पासून कर्तव्यावर असतांना आज दुपार पर्यंत मृतक किशोरकडे कोणाचेच लक्ष नव्हते हे विशेष. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. किशोर नेवारे यांचा अंधारात पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाल्याचे आढळून आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जाधव यांनी दिली आहे. पुढील तपास सिरोंचा पोलीस करीत आहे.

अनेक प्रश्नचिन्ह

रात्रो पासून कर्तव्यावर असतांना आज दुपारी किशोरच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रात्रोपासून सकाळपर्यंत पोलीस शिपायाबाबत कोणतीही आद्यवत माहिती घेण्यात आली नाही काय ? हत्या की अपघात ? असे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here