गडचिरोली जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना मिळाली ५ ब्रास मोफत रेती

893

– अमिर्झा येथील १५ तर ग्राम पंचायत टेंभा येथील ५ लाभार्थ्यांना लाभ
The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील राममंदिर घाट, आंबेशिवणी येथे घरकुलासाठी मोफत ५ ब्रास वाळू वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्या आला. ग्राम पंचायत अमिर्झा येथील १५ तर ग्राम पंचायत टेंभा येथील ५ लाभार्थ्यांना यावेळी लाभ देण्यात आला.या प्रसंगी लाभार्थ्यांना तहसील कार्यालामार्फत दिलेल्या झीरो रॉयल्टी पास देऊन रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरांना गडचिरोली विधान सभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
घरकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास रेतीचा जी आर आहे. त्याच्या मदतीने जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी लाभार्थ्यांसाठी घाट मंजूर करून रेती उचलण्याची परवानगी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद आणि प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा देवेंद्र भूयार यांनी लाभार्थ्यांचे नियोजन करून रेती वाटपाचा कार्यक्रम आखून दिला. त्यानुरूप जिल्हाभरात सर्व लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरु करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांनी वारंवार पाठपुरावा केला तसेच वेळोवेळी सहकार्य केले.
तहसिलदार महेंद्र गणविर यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडून ५०० ब्रास मोफत वाहतूक परवाना काढून यात मोलाची कामगिरी पार पाडली. सर्व घरकुल लाभार्थ्यांनी आपली रेती उचल करुन वेळेत घरकुल पुर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. प्रकल्प संचालक भुयार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या सन २०२१ -२२ च्या लक्षांकामधे वाढ झाली असल्याचे तसेच अल्पसंख्यांक व ओबीसी साठी वाढीव घरे मंजूर झाली असल्याचे सांगितले. गट विकास अधिकारी मुकेश माहोर यांनी वाढीव लाभार्थ्यांनी ऑनलाईन मंजुरी तसेच पहिला हफ्ता टाकण्यासाठी आवश्यक कागपत्रे पंचायत समिती ला जमा करण्याचे आवाहन केले. तहसिलदार गणवीर यांनी सद्या तालुक्यात घरकुलांसाठी आंबेशिवनी आणि बोदली हे दोन घाट चालू करण्यात आल्याचे सांगितले. पुढील आठवड्यात आणखी काही घाट रेती साठी सुरू करण्याचे नियोजन असून घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर रेती उचल करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी आमिर्झा येथील सरपंच सोनिताई नागपुरे, अमिर्झा येथील ग्राम सेविका वासंती देशमुख, तलाठी आंबेशिवनी बांडे, ग्राम सेवक टेंभा कोलते, घरकुल लाभार्थी तसेच नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here