– या आधीही घडली अशी घटना
– पोलीस विभागात खळबळ
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज २५ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलीस विभागासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. नितेश अशोक भैसारे (३६ ) असे मृतक शिपायाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नितेश भैसारे हा गडचिरोली जिल्हयातील अहेरी येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. आज सकाळच्या सुमारास माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाडयात तैनात असतांना अचानक टोकाचे पाऊल उचलून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेेने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अदयाप कळू शकले नाही.
नितेश हा मुळचा चंद्रपूर जिल्हयातील रहिवासी असून पत्नी, मुलगा व मुलीसह तो अहेरी येथे वास्तव्य करीत होता. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
या अगोदरही २० फेब्रवारी रोजी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे सुरक्षा रक्षक असलेल्या प्रमोद शेकोकर या पोलीस शिपायाने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.