The गडविश्व
देसाईगंज : तालुका मुख्यालयापासुन ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकडी येथील शेतशिवारात एक तरुण मृतावस्थेत आढळून आला आहे.
सुनिल उर्फ राजु जयदेव बनसोड (३०) रा.कोकडी असे मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील कोकडी येथील सुनिल उर्फ राजु जयदेव बनसोड हा त्याच्या शेतात मृतावस्थेत आढळून आला. सुनील हा दारुच्या अत्यंत आहारी गेलेला असल्याचे समजते यातुनच त्या सभोवती देशी दारुच्या निपा, डीस्पोबल ग्लास सापडून आले व यातच त्याचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जात आहे.
घटनेची माहिती होताच देसाईगंज पोलिसानी घटनास्थळी भेट देऊन मर्ग दाखल केला व उत्तरीय तपासणी नंतर शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश मसराम यांचे मार्गदर्शनात बीट जमादार गौरकर हे तपास करीत आहे.