The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली, धानोरा, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, कुरखेडा, अहेरी व चामोर्शी या तालुका मुख्यालयात मुक्तिपथ तर्फे अयोजित क्लिनिकचा एकूण ५९ रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी रुग्णांवर औषोधोपचार करीत समुपदेशन सुद्धा करण्यात आले.
दारूमुक्त होण्याची इच्छा असलेल्या जिल्ह्यातील विविध तालुक्यातील रुग्णांना उपचार मिळावे, यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे नियोजित दिवशी तालुका मुख्यालयी क्लिनिकचे आयोजन केले जाते. सोमवारी गडचिरोली मुक्तीपथ तालुका कार्यालयात ६, बुधवारी धानोरा क्लिनिकमध्ये ११ व भामरागड ६, गुरुवारी एटपल्ली ७ तर शुक्रवारी आयोजित सिरोंचा क्लिनिकमध्ये १०, कुरखेडा ३, अहेरी ८ व चामोर्शी ८ अशा एकूण ५९ रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
क्लिनिकला येणाऱ्या रुग्णांना दारूचा व्यसनातून बाहेर पडण्यास मदत व्हावी, यासाठी औषोधोपचारासह समुपदेशन देखील करण्यात येते. क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती देत समुपदेशन करण्यात आले. रुग्णांची केस हिष्ट्री घेत दारूचे दुष्परिणाम सांगितले.