– गांधी विचार संस्कार परीक्षेत मिळविले यश
The गडविश्व
चिमूर : गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव तर्फे गांधी विचार संस्कार परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यश परीक्षेत जनता विद्यालय तथा क.महा.नेरी येथील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगावच्या वतीने गांधी विचार संस्कार परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत जनता विद्यालय तथा क.महा.नेरी येथील इयत्ता ५ वी ते ८ वी च्या एकूण ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात प्रत्येक वर्गातून ३ विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले आहे. या परीक्षेतील उत्कृष्ट सहभागा बद्दल गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव तर्फे शाळेला स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. सदर परीक्षेचे आयोजन् शिक्षक वैभव चौधरी यांनी केले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षकवृंद, पालक वर्गाला दिले आहे. विद्यालयाचे प्राचार्य येरणे यांनी यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.