अवैधरित्या लाकडांची वाहतूक : ट्रॅक्टरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

485

– दोन आरोपी ताब्यात
The गडविश्व
आलापल्ली : वनविभागा अंतर्गत येत असलेल्या पिरमिली वनपरिक्षेत्रातील अवैधरित्या लकडांची वाहतूक करतांना ट्रॅक्टरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई २६ एप्रिल रोजी करण्यात आली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रभाकर बोंदय्या जंगीडवार (४५) रा.पिरमिली, रोशन संपत गावडे (२५) रा.पिरमिली असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नवे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, कक्ष क्रमांक ९२ मध्ये उपविभागीय वनाअधिकारी नितेश शंकर देवगडे यांच्या नेतृत्वात २६ एप्रिल रोजी रोजी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान गस्त करत असताना पिरमिली वनपरिक्षेञातील वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या अधिनिस्त क्षेञीय कर्मचारी यांना अवैद्यरित्या लाकुड भरुन वाहतुक करीत असलेले ट्रॅक्टर निदर्शनास आले. यावेळी वनाधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर किंमत ९५०००० व ३३ नग लाकुड किंमत ४७२६९ रुपये असा एकूण ९ लाख ९७ हजार २६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई गडचिरोली वनवृत्ताचे वनरक्षक डॉ.किशोर मानकर व आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल सिंग टोलिया यांच्या मार्गदर्शनात अलपल्लीचे उपविभागीय वनाअधिकारी नितेश शंकर देवगडे, पेरमिलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश वसंत शेरेकर, क्षेञ सहाय्यक मंगरु कोलु तिम्मा, केशव सावजी तुलावी, वसंत चिन्नाजी पागे, आजमखान महेबुब खान पठाण, नियत वनरक्षक देविदास देवराव मेश्राम, रविद्र घाटुजी येरेवार,अविनाश कोडापे, विनोद आञाम, प्रमानंद कोकोडे, महेश जिवन मेश्राम, सुरेद्र बंदुके, नजीम खान पठाण, वनमजुर चरनदास गर्गम, शंकर आतकुलवार, वाहन चालक सचिन डोंगरे यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here