लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांची लष्कराच्या उप प्रमुख पदी नियुक्ती

228

– १ मे रोजी स्वीकारणार पदभार
The गडविश्व
मुंबई : लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांची लष्कराच्या उप प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते १ मे रोजी पदभार स्वीकारणार आहेत. लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांची उप लष्करप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
लेफ्टनंट जनरल राजू सध्या डीजी मिलिटरी ऑपरेशन्सचे प्रमुख आहेत. कमांडर नसतानाही राजू उप लष्करप्रमुख जबाबदारी सांभाळणार आहेत. यापूर्वी त्यांनी श्रीनगरमध्ये १५ कॉर्प्सचे नेतृत्व केले होते. राजू यांना १५ डिसेंबर १९८४ रोजी जाट रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले. त्यांची कारकीर्द ३८ वर्षांची होती. जिथे ते लष्कराच्या मुख्यालयात अनेक महत्त्वाच्या रजिमेंटल, कर्मचारी आणि निर्देशात्मक नियुक्त्यांचा भाग राहिले.
काश्मीरमध्ये तैनात असताना त्यांनी ‘माँ बुला रही है ‘मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी दहशतवाद्यांशी चकमकीच्या ठिकाणी जाऊन त्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली. दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे हा त्याचा उद्देश होता. राजू एक उत्कृष्ट पायलट देखील आहेत आणि UNOSOM II अंतर्गत सोमालियामधील कारवाई देखील सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here