The गडविश्व
नवी दिल्ली : उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. नीट परीक्षा त्यासोबतच JEE परीक्षा यांच्या तारखांचा विचार करून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता त्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) पुढे ढकलण्यात आल्या होत्या. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा ३ ते १० जून महिन्यात होणार होत्या. मात्र JEE आणि NEET परीक्षांमुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
वेळापत्रक