The गडविश्व
देसाईगंज : तालुक्यातील उसेगाव जंगल परिसरात वाघाने हल्ला करुन युवकाला ठार केल्याची दुर्देवी घटना आज ३ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. अजीत सोमेश्वर (सोमा) नाकाडे (२१) रा. चोप (कोरेगाव) असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
वाघाने युवकाला जंगलात फरफडत नेल्याची माहिती गावकरी व वन विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांना मिळाली असता जंगलात शोध मोहीम राबविली. तब्बल दीड-दोन तासानंतर युवकाचे शव वन कर्मचारी यांना मिळून आले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. परिसरात वाघाचा वावर असून यापूर्वीही अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत.