The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल सोशल वर्क येथील बीएसडब्ल्यू भाग २ च्या विद्यार्थ्यांनी समवर्ती सराव अध्ययन अंतर्गत बुधवारी जिल्हा कारागृह या संस्थेला भेट दिली. तसेच जिल्हा कारागृहाची माहीत विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
जिल्हा कारागृहाची स्थापना सन २०१४ ते २०१५ या दरम्यान झाली. संस्थेची संपूर्ण माहिती अधीक्षक बी. सी. निमगडे यांनी दिली. या संस्था भेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कारागृह कसे राहते, तेथील कैदी व्यक्तीचे विचार, त्यांना मिळणारे जेवण, व्यवस्था, राहणीमान, सोयीसुविधा याविषयी माहिती मिळाली. पर्यवेक्षक म्हणून प्रा. तायडे उपस्थित होते. संस्था भेट यशस्वी करण्यासाठी राकेश पूंगटी, चेतन मडावी, प्रणय जुमनाके, मधुर कुरुले, तन्वी भोयर, रागिनी गुरनुले, आदिती तेलकापल्लीवार, सपना बावणे, काजल कोकोडे, राणी कांबळे, दृष्टी ठाकूर, आयशानाज शेख आदींनी परिश्रम घेतले.