‘काटोल’ हि नागपूरची सॅटॅलाइट सिटी म्हणून ओळखली जाणार : केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी

386

– नागपूर काटोल रस्त्याच्या आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा नितीन गडकरींच्या हस्ते आरंभ

THE गडविश्व
नागपूर : ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाला सर्व परवानग्या मिळाल्या असून त्याचे काम आता वर्षभरात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करून काटोल ते नागपूर हे अंतर केवळ १५ ते २० मिनिटात कापता येईल आणि काटोल ही नागपूरची सॅटॅलाइट सिटी म्हणून ओळखली जाईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी काल नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय महामार्ग ३५३ जेके या नागपूर काटोल रस्त्याच्या आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा कार्यारंभ काल केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, काटोलच्या नगराध्यक्षा वैशाली ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर ते काटोल या रस्त्यामध्ये वनविभागाच्या परवानगीचा तसेच इतर अनेक अडचणी आल्या यासंदर्भातील अडचणी दूर करून आता या चौपदरी करण्याचे काम आता चालू झाले आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पामध्ये असणाऱ्या कामासाठी एकंदरीत १ हजार १८४ कोटी निधीची तरतूद केली असून रस्त्याच्या याभागाची लांबी ४८. २० किलोमीटर आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणामध्ये काटोल बायपासच्या शेवटी आणि कळमेश्वर बायपास या दोन्ही टोकावर एका बाजूचे उड्डाणपूल बांधण्याचे काम देखील अंतर्भूत आहे त्यामुळे कळमेश्वर आणि काटोल शहराकडे जाणारी वाहतूक सुरक्षित आणि सोयीची ठरणार आहे.नागपूर जवळच्या रिंग रोडचे काम सुद्धा फेटरी जवळ चालू होणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
या रस्त्यामुळे नागपूर शहराची काटोल, वरुड तालुक्यासोबतची कनेक्टिव्हिटी चांगली होणार असून यामुळे स्थानिक तसेच उत्पादनांची बाजारपेठापर्यंत वाहतुक सुकर होणार आहे. या रस्त्यावर ५ उड्डाणपुल तसेच १३ भुयारी मार्ग असून रेल्वे क्रॉसिंग मुळे वेळ आणि इंधनाच्या बचत होण्यासोबतच प्रदूषण नियंत्रणात मदत होणार आहे.
काटोल नगर परिषदेने राज्यातील पहिल्या ५ नगरपालिकेमध्ये आपल्या कार्यकतृत्वाने नाव मिळवले असल्याचा उल्लेख करत काटोल नगरपरिषदेने उपलब्ध करुन दिलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जलतरण तलाव यासारख्या सुविधांमुळे येथील विद्यार्थ्यांना चांगली सुविधा मिळत असून काटोलचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक तसेच सांस्कृतिक विकास होत आहे असेही केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here