‘या’ जिल्ह्यांत उष्णतेच्या तीव्र लाटेचा धोका : हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा

505

The गडविश्व
मुंबई : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुढचे तीन दिवस तापमानाचा पारा वाढलेलाच राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशीम या जिल्ह्यात पुढील तीन दिवस यलो अलर्ट राहणार आहे.
काल रविवारी ब्रह्मपुरीत ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर वर्धा चंद्रपूर, अमरावती,, अकोला जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४४ अंशाच्या पुढे होता . बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला चक्रीवादळ १० आणि ११ मे रोजी तीव्र स्वरूप घेणार असल्याची माहिती आहे. या कालावधीत राज्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here