– १० हजारांची स्विकारली लाच
The गडविश्व
गडचिरोली : एक हजार मासल पक्षी कुकुटपालन योजनेचा लाभ देण्याच्या कामाकरिता १० हजारांची लाच स्विकारतांना चामोर्शी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी सागर पोपट डुकरे (३२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
प्राप्त माहितीनुसार, तक्ररदार यांनी एक हजार मांसल पंक्षी कुकुटपालन योजनेचा लाभ घेण्याकरिता पशुसंवर्धन अधिकारी सागर पोपट डुकरे यांच्याकडे अर्ज केला असता तक्रारदार यांना सदर योजनेचा लाभ देण्याकरिता पशुसंवर्धन अधिकारी डुकरे यांनी १० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची कोणतीही इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवि गडचिरोली येथे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करून सापळा रचून आज १० मे रोजी पंचायत समिती चामोर्शी येथील पशुसंवर्धन विभाग कार्यालयातील कक्षात तडजोडीअंती १० हजारांची लाच रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पशुसंवर्धन विकास अधिकारी सागर पोपट डुकरे यांना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरूध्द पोलीस स्टेशन चामोर्शी येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोनि शिवाजी राठोड, पोनि श्रीधर भोसले, सफौ प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, पोना राजेश पद्मगिरवार, पोना श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप घोरमोडे, मपोशी ज्योत्सना वसाके, चापोना स्वप्नील वडेट्टीवार यांनी केली.