गोंडवाना विद्यापीठातील प्रा. डॉ. प्रशांत सोनावणे यांच्या ‘डिव्हाइस डिझाइनला’ भारत सरकारची पेटंट मान्यता प्रदान

447

The गडविश्व
गडचिरोली : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक वाणिज्य विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. प्रशांत सोनावणे यांना भारत सरकार कडून ‘स्मार्ट प्रॉब्लेम रिझोल्व्हिंग यंत्राच्या डिझाइन’ पेटंटला मान्यता प्रदान केली आहे.
बऱ्याचदा संस्थेमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या समस्या भेडसावत असतात. संस्थेमधील मानव संसाधन सतत आपल्या डोक्यात विविध समस्यांच्या निराकरणा विषयी विचार करत असतो आणि संस्थेमधील समस्यांचे समाधान शोधात असतो. परंतु कालांतराने आपण ते विसरून जात असतो. त्यामुळे पुन्हा तीच समस्या आपल्या समोर उभी राहिली की आपण नक्की कुठले समाधान शोधले होते या बाबत विस्मरण होत असते. या करीता स्मार्ट प्रॉब्लेम रिझोल्व्हिंग यंत्राच्या नवीन डिझाइनचा शोध लावला आहे. ही डिझाइन डिव्हाइस कार्यालयात, विभागात तसेच सभेत ठेऊ शकता येणार आहे. या डिझाइन मध्ये एक स्मार्ट रोबोटिक उपकरणाचा समावेश आहे. हे स्मार्ट प्रॉब्लेम रिझोल्व्हिंग डिव्हाईस एखाद्या कार्यालयात, संस्थेत मानवाशी संवाद करून त्यांची व्यवसायिक, वैयक्तिक समस्या समजून घेऊन त्याचे पृथक्करण करून त्यावर उपाय सांगतो. संस्थेच्या पर्यावरणातील सर्व समस्यांचे विश्लेषणात्मक अभ्यास करण्यासाठी आणि भविष्यात अशाच प्रकारची समस्या उद्भवल्यास त्याच समस्येवर उपाय म्हणून कार्य करण्यासाठी रोबोट मशीन लर्निंग यंत्रणेसहप्रोग्राम केलेले आहे. हे उपकरण इतके स्मार्ट आहे की कंपनीला ज्या तांत्रिक समस्येचा सामना करावा लागत आहे, त्याबद्दल माहिती दिल्यास इंटरनेटद्वारे सर्वात इष्टतम उपाय शोधण्यासाठी आणि योग्य वेळेत समस्या सोडवण्यासाठी एक स्मार्ट प्रोसेसिंग सिस्टम त्यामधे असणार आहे. व्यवस्थापनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि भावनिक पैलूंसह मानवी परस्परसंवाद समजून घेण्यासाठी या डिव्हाइसमध्ये क्षमता आहे. हे प्रत्येक परस्पर संवादाने सुधारते आणि सर्व उपाय सखोल संवादानंतर सादर केले जातात. या डिझाइन डिव्हाइसचा उपयोग कंपनी, शैक्षणिक संस्था आणि व्यवसायिक कार्यालये येथे होऊ शकतो.
डॉ.प्रशांत सोनवणे यांच्या यशाबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे , कुलसचिव डॉ. अनिल झेड . चिताडे , वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अरूंधती निनावे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here