तो पुन्हा आला… आरमोरीत वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

1160

– दोन दिवसातील दुसरी घटना, नागरिकात भीतीचे वातावरण
The गडविश्व
आरमोरी : तालुक्यातील अरसोडा येथे काल १३ मे रोजी महिलेला वाघाने ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आज पुन्हा १४ मे रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आरमोरी येथील देसाईगंज वडसा मार्गावर असलेल्या आयटीआय जवळ शेतशिवारात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नंदू गोपाळा मेश्राम (५०) रा.आरमोरी असे मृतक शेतकऱ्याचर नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरमोरी येथील देसाईगंज मार्गावर असलेल्या आयटीआय नजीकच्या डम्पिंग यार्ड जवळ नंदू मेश्राम चे घर आहे. घराला लागूनच त्यांची शेती आहे दरम्यान आज शनिवारी सकाळच्या सुमारास शेतात पाणी करत असतांना वाघाने हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनअधिकारी व पोलीस घटनस्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास करीत आहेत.
शहरानजीक असलेल्या अरसोडा येथे काल १३ मे रोजी सकाळच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना ताजी असतांनाच आज पुन्हा वाघाने हल्ला करून शेतकऱ्यास ठार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या भीतीने शेती करायची कशी असा सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांत निर्माण झाला असून मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. तर काल महिलेस ठार केलेला नरभक्षी वाघच आज पुन्हा शेतकऱ्याला ठार केलेला वाघ असावा असा सुद्धा अंदाज लावण्यात येत आहे. नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतुन होता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here