सावधान : वाघ बघण्यासाठी फिरणाऱ्या वाहनचालकांवर नवीन मोटार वाहन कायद्याअंतर्गत होणार दंडात्मक कारवाई

1350

– गडचिरोलीचे मोटार वाहन निरीक्षक सचिन य. जमखंडीकर यांची माहिती
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्य़ातील आरमोरी आणि वडसा या वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या भागात वाघांचा व हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढल्यामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच लोकांवर हल्ले इत्यादी सारख्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे रात्री या भागात लोकांचा विनाकारण वाघ पाहण्यासाठी वावर वाढला आहे. या भागात फिरणाऱ्या वाहनचालकांवर नवीन मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विनाकारण वाघ पाहण्यासाठी रात्री अपरात्री लोक वाहने घेवून फिरत असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. यातून हिंस्त्र प्राणी मनुष्यावर हल्ला करण्याची शक्यता वाढू लागली आहे. जर कोणी असे वाहन घेवून फिरत असतना अढळ्यास त्यांचेवर कारवाई केली जाईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे
गडचिरोलीचे मोटार वाहन निरीक्षक सचिन य. जमखंडीकर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here