– परिसरात भीतीचे वातावरण
THE गडविश्व
कांकेर : छत्तीसगडच्या बस्तर भागातील कांकेरमधील कोयलीबेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बदरंगी गावात नक्षल्यांनी भर दिवसा बाजारात युवकाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेदरम्यान बाजारात एकच खळबळ उडाली होती. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोयलीबेडाच्या बदरंगी येथे आज सोमवारी आठवडी बाजारात लागणाऱ्या कोंबडा बाजारात कोयलीबेडा येथील युवक महेश बघेल गेला होता. तीन वर्षाअगोदार युवक व त्याच्या परीवारावर नक्षल्यांनी पोलीस खबऱ्या असल्याचा आरोप लावला होता. तेव्हापासून मृतक महेश बघेल हा नक्षल्यांच्या निशाण्यावर होता व त्याच्या शोधात होते. दरम्यान आज महेश बघेल कोंबडा बाजारात येत असल्याची गुप्त माहिती नक्षल्यांना मिळाली असता सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास नक्षली कोंबडा बाजारात पोहचून महेश बघेल च्या सभोवताल झाले व भर बाजारातच महेश बघेल ची गोळ्या झाडून हत्या केली. यावेळी घटनास्थळी एकच खळबळ उडाली व घटनास्थळावरून सर्व नक्षली फरार झाले.