दोन ट्रक चा भिषण अपघात : आगीत नऊ जणांचा मृत्यू

1139

– चंद्रपूर-मुल मार्गावरील घटना

The गडविश्व
चंद्रपूर : शहराजवळील अजयपूर नजीक २ ट्रकचा काल १९ मे रोजी रात्रोच्या सुमारास अपघात झाला. या अपघातानंतर ट्रकला भिषण आग लागली यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहीत समोर येत आहे.
सदर अपघातातील एक ट्रक डिझेल टॅंकर तर एक दुसरा ट्रक लाकडाचा असल्याचे कळते. दोन्ही ट्रकमध्ये धडक झाल्याने ट्रकला आग लागली पाहता पाहता आगीने रोद्र रूप धारण केले यात नऊ जणांचा मृत्यू झाला. सदर ट्रक ला आग लागल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती तर अपघात झाल्यांनतर अग्निशमन दलास सुध्दा पोहचण्यास वेळ लागल्याचे कळते. आज सकाळच्या सुमारास अपघाताची चौकशी करत असतांना जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळले त्यांची ओळख अद्याप पटली नाही असे पोलीसांकडून सांगण्यात येत आहे. अधिक तपाास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here