ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ‘या’ वाघाचा मृत्यू

1390

The गडविश्व
चंद्रपूर : जिल्ह्यात असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘वाघडोह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाचा आज मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. वाघडोह हा ‘Big Daddy Of Tiger’ या नावाने सुद्धा ओळखला जायचा. वाघडोह हा १७ वर्षाच्या होता अशी माहिती आहे.
वाघडोह हा वयोवृद्ध व अशक्त झाल्याने मागील काही दिवसांपासून वनविभागाच्या नजरेत होता, वनविभागाची त्यावर २४ तास नजर होती. आज सिनाळा परिसरात त्याचा मृतदेह आढळला. या घटनेने वन्यप्रेमींना धक्का बसला आहे. ताडोबा वाघांसाठी प्रसिद्ध आहे येथील वाघांना बघण्याकरिता दूरवरून बाहेर देशातून सुद्धा पर्यटक येत असतात. भारताचा मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दरवर्षी ताडोबाची सैर करतो तसेच अनेक फलंदाज, विदेशी खेळाडू, अभिनेत्यांनी आतापर्यंत अनेकदा ताडोबा जंगलाची सैर केली आहे.
वाघडोह हा ताडोबा जंगलातील प्रसिद्ध वाघ होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here