अनुसूचित जमातिच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना

439

The गडविश्व
गडचिरोली : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास,प्रकल्प भामरागड जि.गडचिरोली अंतर्गत व एटापल्ली तालुक्यातील अनुसूचित जमातिच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार पोष्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती संबंधी महाडिबीटी पोर्टलच्या सन 2020-21 व सन 2021- 22 या शैक्षणिक वर्षामधील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरीता 31 मे 2022 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तसेच 9 मे 2022 अन्वये महाविद्यालययातील प्राचार्य यांना सुध्दा कळविण्यात आले आहेत.तरी या प्रकल्प कार्यालय,भामरागड अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी सन 2020-21 व 2021-22 या शैक्षणिक वर्षामधील प्रलंबीत असलेले अर्ज महाडिबीटी पोर्टल द्वारे शिष्यवृत्तीचे अर्ज दिनांक 31 मे 2022 पर्यत महाविद्यालयस्तरावर सादर करण्यात यावे.असे आवाहन सहा.प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here