इंदाळा (पारडी) परिसरात रानडुकराची शिकार : आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी

536

The गडविश्व
गडचिरोली : वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या इंदाळा (पारडी) परिसरात रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी तिन आरोपींना अटक केली असता न्यायालयाने दोन दिवसांची वनकोठडी ठोठावली आहे. रमेश कुडो, मानसू कुडो रा. इंदाळा व ऋशिदेव मट्टामी अशी अटकेतील नावे असून सनकु पुडो हा फरार आहे. गडचिरोली पासून काही अंतरावर असलेल्या इंदाळा परिसरात रानडुकराची शिकार केल्याची गोपनिय माहिती वनविभागा मिळाली असता २३ मे रोजी रात्रोच्या सुमारास वनकर्मचाऱ्यांनी शोधमोहिम राबविली. यादरम्यान चार व्यक्ती संशयदस्पदरित्या आढळून आले असता त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यातील एकजण पसार झाला तर तिघांना रानडुकराचे मास व साहित्य जप्त करून ताब्यात घेतले. अरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता तिघांनाही दोन दिवसांची वनकोठडी ठोठवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here