The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या वतीन प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रियेची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादीवर आक्षेप असल्याच पाच दिवसांच्या आत सादर करावे असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक संवर्गाच्या संगणकीय प्रणालीव्दारे सर्वसाधारण बदली सन २०२२ करीता ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयातील निर्देशानुसार ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्ष सलग सेवा व विद्यमान शाळेत ५ वर्ष सलल सेवा , सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्ष सलग सेवा झालेले परंतु विद्यमान शाळेत ५ वर्ष सलग सेवा न झालेले, विनंती बदल करीता निश्चित केलेल्या बाबीमध्ये मोडणारे विशेष संवर्ग भाग १ मध्ये मोडणारे शिक्षक, पती-पत्नी एकत्रिकरण अतंर्गत मोडणारे विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षक तसेच अवघड क्षेत्रात सलग ३ वर्ष सेवा झालेले बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांची शिक्षक संवर्गनिहाय प्राथमिक शिक्षक, पदविधर शिक्षक, विषय शिक्षक व उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांची माध्यमनिहाय यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
सदर यादीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे लेखी आक्षेप, आवश्क पुरावा, दाखल दस्ताऐवजासह परिपत्रक प्रसिध्दीच्या दिनांकापासून पाच दिवसांच्या आत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावे असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.