THE गडविश्व
गडचिरोली : स्थानिक फुले- आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती (बालिका दिन) साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरवात महाविद्यालयातील बालिकेच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण आणि दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. सरिता बुटले आणि कु. प्रवीणा लाडवे या विद्यार्थिनीने गीत सादर केले तर उपस्थित मान्यवरांनी व अवंती वाटे ह्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरीत्रावर प्रकाश टाकला.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश खंगार, प्रा. यादव गहानें, प्रा. विवेक गोर्लावर, प्रा. कविता उईके, संदीप बैस, लोमेश देशमुख, राजेश पोहाणे, कु. कादंबरी केदार, निशांत चहांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. वर्षा तिडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार काजल कुमरे या विद्यार्थिनीने मानले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होते.