हैदराबादेत हजारो नागरिक योग उत्सवात सामील

337

– आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या २५ दिवस उलट गणतीचे (कॉउंटडाउन) औचित्य 
The गडविश्व
हैदराबाद : तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्याराजन यांनी केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासमवेत आज २७ मे २०२२ रोजी हैदराबाद येथील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या २५ दिवसांच्या उलट गणती (काउंटडाउन) कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि पूर्वोत्तर राज्ये विकास मंत्री, जी किशन रेड्डी; राज्यमंत्री महेंद्र मंजुपारा (आयुष मंत्रालय), आयुष मंत्रालयाच्या सहसचिव, कविता गर्ग; डॉ. ईश्वर बसवराद्दी, संचालक – मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान (MDNIY) आणि प्रख्यात योग गुरु, चित्रपट तारे, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, सेलिब्रिटी आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने योगप्रेमी, विद्यार्थी व सामान्य नागरिक सहभागी झाले होते.  भारताची सनातन योग संस्कृती आणि तिचे फायदे तळागाळात सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिनांक २१ जूनपर्यंत देशभरात ‘१०० दिवस, १०० शहरे, १०० संस्था’ या मोहिमेचे आयोजन केले जाणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जून रोजी म्हैसूर, कर्नाटक येथे नियोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here