– जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन १०९८ गडचिरोली व पोलीस स्टेशन गडचिरोलीची कारवाई
गडविश्व
गडचिरोली : शहरातील तेली वार्डात होणारा बालविवाह होणार आहे शी माहिती मिळाली असता जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन १०९८ गडचिरोली व पोलीस स्टेशन गडचिरोली ने एक दिवसाआधी विवाह थांबविला.
शहरातील तेली वार्डात एक बालविवाह होणार आहे अशी २६ मे रोजी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार करण्यात आली. ताकरीच्या अनुषंगाने लगेच सायंकाळी ८ वाजता पोलीस स्टेशन गडचिरोली, जिल्हा बाल संरक्षण टीम गडचिरोली व चाईल्ड लाईन टीम यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता बालिकेचे घर गाठले व बालिकेचा जन्म पुरावा तपासणी करून, बालिका १८ वर्षाखालील असल्याची खात्री पटल्यानंतर लगेच बालिकेचे व कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले.
मुलिकडील व मुलाकडील हे दोन्ही मंडळी गडचिरोली शहरातील असून त्यांचा बाल विवाह दुसऱ्या दिवशी गडचिरोली येथे होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली व चाईल्ड लाईन टीम यांनी सदर बालिकेचे घर गाठून मुलीच्या आईकडून मुलीचे १८ वर्ष होइपर्यंत बालिकेचा विवाह करणार नाही असे हमीपत्र लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले यांच्या उपस्थितीत वधू पक्ष यांना एकत्र बसवून बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायद्या नुसार होणारी कार्यवाही याबाबत उपस्थित कुटूंबातील सदस्यांना माहिती देण्यात आली.
सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, तसेच पोलीस स्टेशन गडचिरोली येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम गोरे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, चाईल्ड लाईन जिल्हा समन्वक दिनेश बोरकुटे, बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, सामजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, अविनाश राऊत चाईल्ड लाईन टीम मेंबर यांनी केली.
बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्याकडे बलिकेला सादर करून हमीपत्र लिहून घेण्यात आले. १५ वर्ष ४ महिने वय असणाऱ्या बालिकेचा बालविवाह थांबवण्यात जिल्हा बाल संरक्षण टीम, पोलीस विभाग, चाईल्ड लाईन गडचिरोली यांना यश आले हे विशेष आहे.
अशाप्रकारे जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व चाइल्ड लाईन टोल फ्री क्रमांक १०९८ या क्रमांकावर बाल विवाह बाबत संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे.