गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रद्द झाल्याचा विरोधकांचा कांगावा चुकीचा

372

– पालकमंत्र्यांकडून दखल, शिवसेना जिल्हा समन्वयक किरण पांडव यांची माहिती

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल येणार असल्याने रद्द झाले हा विरोधकांचा कांगावा चुकीचा आहे. सदर महाविद्यालयाचा प्रस्ताव प्रक्रियेमध्ये असून पालकमंत्री एकनाथ शिदे यांच्याकडून दखल घेतली जात असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सुविधा व बेड संख्या पुर्णपणे करण्यासाठी नुकताच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून शासकीय महिला व बाल रूग्णालयात १०० बेडच्या वाढीव बांधकामाला मंजुरी दिली असून त्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या काळात आवश्यक असणारी बेड संख्या पुर्ण होत असल्याने राज्य शासनाकडे तयार असलेला प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. सदर शासकीय महाविद्यालयाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून वैद्यकीय शिक्षण मंत्री डाॅ. अमित अमित देशमुख यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. या पुढील काळात सदर प्रस्ताव राज्य शासनाकडून मंजूर करून आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्या परवागीनंतर केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे परवागीसाठी पाठविला जातो. या प्रस्तावाला राष्ट्रीय आयुविज्ञान आयोग नवी दिल्ली यांची सुध्दा परवानगी आवश्यक असते. या संपुर्ण प्रक्रियेला वेळ लागणार असून गडचिरोली येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रिया पुर्ण झाल्यावर राज्य शासनाकडून निश्चित घोषित केले जाणार असून शिवसेनेकडून याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुराव केला जात आहे. त्यामुळे जिल्हयातील जनतेने विरोधकांनी पसरविलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रद्द झाल्याचा गैरसमज चुकीचा असून लवकरच पालकमंत्री एकनाथ शिदे यांच्याकडून माध्यमांना याविषयी महिती दिली जाणार आहे.
गडचिरोलीसह राज्यात काही ठिकाणी शासनाने सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालया सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागितले होते. काही शिक्षण संस्थांकडून अशा प्रकारे जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालविण्यासाठी पुढाकार घेतला जाऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हयात विकासाची गंगा आणणारे व जनतेच्या मुलभूत समस्यांविषयी तळमळ असणारे पालकमंत्री एकनाथ शिदे हे सुपर स्पेशालिटी हाॅस्पीटलसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चितच प्रयत्नरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here