पक्षांच्या संवर्धनासाठी झाड मालकांना प्रोत्साहन भत्ता द्या

467

– वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर यांची वनसंरक्षक किशोर मानकर यांच्याकडे निवेदनातून मागणी
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या चिंचेच्या झाडावर अनेक पक्षी वास्तव करतात मात्र पक्षांनी केलेल्या घाणेमुळे पावसाळ्यात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिक झाडे व फांद्या तोडतात त्यामुळे पक्षी मृत्युमुखी पडतात. ही बाब लक्षात घेता पक्षांच्या संवर्धनासाठी झाड मालकांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा अशी मागणी वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर यांची वनसंरक्षक किशोर मानकर यांना निवेदनातून केली आहे.
विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या चिंचेच्या झाडावर बगळे, ढोकरी, पानकावळे आदी पक्षी मोठ्या संख्येने वास्तव करतात. परंतु पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे पक्षी घरटे बांधून त्यामध्ये अंडी घालतात व त्यातून पिल्ले जन्माला येतात. पावसाळ्यामध्ये पक्षी घाण करत असतात, दुर्गंधी पसरते व आदी कारणामुळे नागरिक झाडे, झाडाच्या फांद्या तोडत असतात त्यामुळे पक्षी आणि पिल्ले मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडता, तसेच पक्षांना घरटे बांधण्याकरिता झाडे उपलब्ध होत नाहीत. घरटी बांधून राहणाऱ्या पक्षांची संख्या लक्षात घेता ज्या गावांमध्ये पक्षी झाडांवर घरटी बांधून आहेत अशा गावातील झाडांचे सर्वेक्षण करून झाडांची नोंद करून शामप्रसाद मुखर्जी तसेच इतर अन्य शासकीय योजनेतून झाड मालकांना प्रोत्साहन भत्ता दिल्यास झाडांचे संवर्धन होईल परिणामी पक्षांचे संवर्धन करणे शक्य होईल. याकरिता आपण आपल्या स्तरावरून पाठपुरावा करून विदर्भातील चारही जिल्ह्यात पक्षांचे संवर्धन व्हावे यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना आखावी अशी मागणी वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर यांनी गडचिरोलीचे वनसंरक्षक किशोर मानकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here