विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत गडचिरोली संघाला घवघवीत यश

1336

– ७ सुवर्ण, २ रौप्य, २ कांस्य पदक पटकाविले
– अक्षयकुमार कोवासे बेस्ट बॉक्सर अवॉर्ड ने सन्मानित

The गडविश्व
गडचिरोली : नुकत्याच चंद्रपूर येथे पर पडलेल्या वरिष्ठ गटातील मुले व मुलींच्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत गडचिरोली संघानी एकूण ११ पदके पटकविली आहे. त्यात सुवर्ण पदक खेळाडू ४८ किलो मध्ये जयेश गाढवे, ५४ किलो अक्षयकुमार कोवासे, ६३.५ किलो भोजराज अनपत्रावर, ७१ किलो दिपक वरखडे, ९२ किलो पारस राऊत, ४८ किलो कल्याणी महागणकर, ७५ किलो यशश्री साखरे यांनी पटकाविले. रौप्य पदक खेळाडू ४८ किलो मध्ये देवांग महागणकर, ७१ किलो लकी साखरे तर कास्य पदक खेळाडू ४८ किलो मध्ये अनिकेत नैताम, ५१ किलो दिव्या डोरले, तर मनीष जेट्टी याचा ६० किलो मध्ये सहभाग होता.
सदर विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत अक्षयकुमार कोवासे यांनी ५४ किलो वजन गटात उत्कृष्ठ प्रदर्शन करत अंतिम फेरीत नागपूर जिल्ह्याला हरवून सुवर्ण पदक मिळवले व स्पर्धेतील उत्कृष्ठ प्रदर्शनाबद्दल बेस्ट बॉक्सर अवॉर्ड नी सन्मानित करण्यात आले. खेळाडूंच्या या यशाबद्दल गडचिरोली बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जगदीश मस्के, सचिव यशवंत कुरुडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे , कुस्ती प्रशिक्षक बडगेलवार यांनी अभिनंदन केले.
सदर खेळाडूंच्या यशाने जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा रोवला आहे. विजेत्यांचार अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सदर खेळाडू गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे नियमित खेळाडू असून त्यांना बॉक्सिंग प्रशिक्षक महेश निलेकार, पंकज मडावी, संतोष गैनवार, निखिल इंगडे यांचे मार्गदर्शनात लाभले. त्यांना प्रवीण मेश्राम, संजय मानकर, तसेच गडचिरोली बॉक्सिंग परिवाराने त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here