मुरुगाव येथे आजादी का अमृत महोत्सव तथा महा राजस्व अभियान

361

The गडविश्व
ता.प्र/ धानोरा : तालुका पासुन २५ कि.मि.अतंरावर असलेल्या मुरुमगाव येथे काल ३१ मे रोजी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी महेंद्र गणवीर, उद्घाटक आमदार कृष्णा गजबे, प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद सदस्या लता पुंघाटे, पंचायत समिती धानोरा चे संवर्ग विकास अधिकारी कोमलवार, धानोराचे माजी पंचायत समिती सभापती अजमन रावटे , पंचायत समिती धानोराचे कृषी अधिकारी आनंद पाल, ग्रामपंचायत मुरुमगावचे सरपंच शिवप्रसाद गव्र्हणा, डॉ. राहुल बनसोड, शाखा अभियंता mscb चेतन, नायब तहसीलदार एम.डी. वाकुडकर उपस्थित होते.
प्रथम मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार एम.डी. वाकुडकर यांनी केले. आनंदपाल यांनी शेतकऱ्यांना शेतीच्या योजना ची माहिती सागताना शेतीचे उत्पादन घेताना सेंद्रिय खतासह मिश्र खतांचा जास्त वापर करावे असे मार्गदर्शन केले. तसेच अजमन रावटे आणि सरपंच शिवप्रसाद गव्र्हणा यांनी मुरुमगाव साजाचे पटवारी उपस्थित राहत नाहीत त्यांच्यासाठी बांधलेले रूम रिकाम्या पडून आहेत. आमदार कृष्णा गजबे यांनी आजादी का अमृत महोत्सव तथा महाराजस्व अभियान शिबिर योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणली असून प्रत्येक विभागाचे अधिकारी व कर्मचारी जनतेच्या दारात जाऊन शासनाच्या योजनेचा फायदा प्रत्येक नागरिकाला घेता येईल यासाठी हे शिबिर घेत असून याचा फायदा प्रत्येक महिला व पुरुषांनी घ्यावा असे आवाहन केले. तसेच जात पडताळणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अडचणी येत असल्याचा मुद्दा विधानसभेत मांडण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे.
या शिबिरात आरोग्य विभाग शेतकरी जनजागरण मेळावा, संजय गांधी निराधार, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना, एकात्मिक बाल विकास पोषक अभियान व महसूल विभागाचे स्टाँल लागले होते. प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांनी जनतेला कागदपत्राची पूर्तता करण्यास मदत केली. कार्यक्रमात मुरुमगाव परिसरातील आंबेझरी सर्व ही चारवाही, रिडवाही, सावरगाव, कोस्मी, देवसुर, कटेझरी यासह परिसरातील जवळपास ४०० ते ५०० नागरिक व महिला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन धानोराचे मंडळ अधिकारी के. पी. ठाकरे यांनी केले तर आभार मंडळ अधिकारी सुभाष सरपे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महसुल कर्मचारी व धानोरा येथून आलेले तहसील कार्यालयातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व कृषी विभागातील आलेल्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here