मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली तर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा

393

The गडविश्व
गडचिरोली : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली, अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील विविध गावांमध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करने आणि महत्वाच्या बाबींविषयी तातडीने पाऊल उचलने असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. त्यामध्ये मुलांनी किचन गार्डन तयार करून त्याची रक्षणाची जबाबदारी घेतली व पालकांना त्या किचन गार्डनचे महत्त्व व फायदे हे किती महत्वाचे आहे हे सांगण्यात आले. पर्यावरणाला धोका असणाऱ्या प्लास्टिक वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी मुलांनी ओला व सुखा कचरा अशा कचरा पेटी तयार करून त्यांचा वापर आपल्या सुखा आणि ओला कचरा वेगवेगळा करण्यासाठी घरी वापरनार आहेत व प्लास्टिक बाटल चा पुनर्वापर करून त्यात वेलींची व फुलांची झाडे लावण्यात आलेली आहेत. सोबतच मुलांनी फळांची झाडे व त्या फळांमार्फत मिळणारे विविध जीवनसत्त्वे आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे मुलांनी मनोगत व्यक्त केले. सोबतच कोरोना काळात झाडे किती महत्वाची आहेत याचे महत्व लक्षात घेऊन आणि झाडांमधून जीवनसत्त्वे मिळणारी फळे देखील रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गरजेची आहे याची जनजागृती मुले व पालक यांच्यासोबत करण्यात आली.
सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे, चामोर्शी तालुक्याचे तालुका समन्वयक योगिता सातपुते व युवा मार्गदर्शन प्रफुल निरूडवार, रोशन तिवाडे, अश्विनी उराडे, पंकज शंभरकर व पालक वर्ग व मॅजिक बस सत्रात सहभागी विद्यार्थी यांच्या परिश्रमाने हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here