– सलग तिसऱ्या वर्षी बंद, कोरोना वाढू नये यासाठी खबरदारी
The गडविश्व
देसाईगंज : जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कोकडी या गावी दरवर्षी मृग नक्षत्राच्या दिवशी मासोळीतून दमा औषधीचे निःशुल्क वाटप केले जाते. परंतु, कोरोनाचे सावट अजूनही पूर्णपणे गेले नसल्याने यंदाही दमा औषध वितरित न करण्याचा निर्णय वैद्यराज प्रल्हाद सोमा कावळे यांनी घेतला आहे.
मागील चार दशकांपासून दरवर्षी मृग नक्षत्राच्या दिवशी प्रल्हाद कावळे मासोळीतून दमा औषध देतात. हे औषध घेण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेशसह इतरही अनेक राज्यांतून दमा रुग्ण कोकडी येथे येतात. हजारो रुग्ण व त्यांचे नातेवाईक मृग नक्षत्राच्या आदल्या दिवसापासून कोकडीत दाखल होतात. मोठ्या संख्येने गर्दी उसळत असल्याने कोकडीला जणू यात्रेचे स्वरूप येते. दोन-तीन दिवस कोकडीत लोकांची मांदियाळी असते. प्रल्हाद कावळे यांचे संपूर्ण कुटुंब, गावकरी, शासन, प्रशासन मिळून-मिसळून दमा औषध वितरणाचा सामाजिक कार्यक्रम यशस्वी करतात.
परिणामी देशात सुरू असलेल्या कोरोना कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता साथीच्या संभाव्य चौथ्या लाटेमुळे पाहता वैद्यराज प्रल्हाद कावळे यांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हा समाजहित समोर ठेवून औषधी वाटप न निर्णय घेण्यात आला आहे.
दमा रुग्णांनी लाभ घेण्यासाठी राज्यातीलच नव्हे इतरही राज्यातील हजारोंच्या संख्येत रुग्ण कोकडी येथे दाखल होत असतात. दमा रुग्णांनी लाभ घेण्यासाठी कोकडी येथे येऊ नये, अशी माहिती प्रल्हाद कावळे यांनी दिली आहे.