चातगाव येथील ‘सर्च’ रुग्णालयात ‘कार्डिओलॉजी ओपीडी’ला सुरुवात.

248

– डॉ. उदय माहूरकर हृदयरोगतज्ज्ञ करणार हृदयविकार असलेल्या रुग्णांची तपासणी
– ११ जून २०२२ या दिवशी ‘सर्च’ मध्ये कार्डिओलॉजी ओपीडी
The गडविश्व
गडचिरोली : हृदयरोग असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. व्यायामाचा अभाव, तणावपूर्ण आयुष्य, धुम्रपान, तंबाखू, गुटखा यांसारखे व्यसन अशा कारणांमुळे हृदय विकार वाढत आहेत. काही वेळा जन्मजात हृदयाला छिद्र असते, त्याला ( congenital) हार्ट डिसीज म्हणतात त्याबरोबरच हार्ट अटॅकमुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिनीत रक्तपुरवठा बंद पडणे. काळाची गरज समजून आणि रुग्णांमधील गुंतागुंतीच्या वाढत्या प्रवृत्तीचा विचार करून चातगाव येथील ‘सर्च’ हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजी ओपीडीला सुरुवात करण्यात आली आहे.
नागपूर येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. उदय माहूरकर आणि त्यांच्या अवंती हॉस्पिटल यांच्या सहकार्याने ‘सर्च’ हॉस्पिटल मध्ये नियमित कार्डिओलॉजी ओपीडी सुरू झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ही ओपीडी असेल. ११ जून या दिवशी ‘सर्च’ मध्ये कार्डिओलॉजी ओपीडी घेण्यात येणार असून डॉ. उदय माहूरकर स्वतः या ओपीडीसाठी उपस्थित राहणार आहेत. हृदय रोगाचे निदान करण्यासाठी शारीरिक तपासणी सोबतच (2 डी इको) तपासण्या केल्या जातील. त्याद्वारे हृदयाची रचना, हृदयाच्या वेगवेगळ्या झडपा आणि त्यांची कार्यक्षमता याची माहिती तज्ञांना मिळते.
छातीत दुखणे, छातीत धडधड होणे, चालताना धाप लागणे, डावा हात दुखणे ,पोटाच्या वरील भागात दुखणे याशिवाय जळजळ होऊन घाम येणे, घाबरल्यासारखे होणे ही हृदयरोगाची लक्षणे असू शकतात. तरी हृदय विकाराने त्रस्त असलेल्या जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा तसेच गैरसोय होऊ नये म्हणून हॉस्पिटल मध्ये पूर्व नोंदणी करावी. असे आवाहन ‘सर्च’ द्वारा करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here