गडचिरोली- देसाईगंज नगरपरिषदेवर राहणार महिला राज

1187

– गडचिरोलीत १४ तर देसाईगंजात ११ जागा महिलांसाठी राखीव

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेवर महिला आरक्षणाची घोषण करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी बुधवारी काढलेल्या अधिसूचनेनुसार दोन्ही नगर परिषदेत महिला राज राहणार आहे.
गडचिरोली नगर परिषदेची सदस्य संख्या २७ आहे. यातील १४ जागा महिलांसाठी राखीव राहणार आहे तर देसाईगंज नगर परिषदेची सदस्य संख्या २१ असून ११ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी संजय मिणाा यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार २७ सदस्यीय गडचिरोली नगरपरिषदेमध्ये २ जागा अनुसुचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित राहतील. तर अनुसूचित जमातीसाठी २ व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी १० जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तर २१ सदस्यीय देसाईगंज नगरपरिषेदेमध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी २ जागा आरक्षित राहतील. तर अनुसुचित जमातीच्या महिलांसाठी एकही जागा आरक्षीत नाही व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ९ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत . महिला उमेदवारांच्या आरक्षणाची घोषणा होताच नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरूवात होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here