मोहसडव्यासह १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल नष्ट

341

– चांदाळा-रानभुमी शेतशिवारात कृती
The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील चांदाळा-रानभुमी शेतशिवारात हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याची माहिती मिळताच गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या गुरुवारी कृती करीत मोहफुलाच्या सडव्यासह १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
चांदाळा व रानभूमी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केली जाते. या गावांच्या माध्यमातून तालुक्यातील बोदली, जेप्रा, जेप्रा चक, राजगाटा माल, राजगटा चक, उसेगाव,मेंढा, राखी, गुरवळा व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरासह इतर गावात सुद्धा दारू पुरविल्या जाते. यामुळे परिसरातील अनेक गावे त्रस्त झाले आहेत. चांदाळा-रानभूमी शेतशिवारात मोहफुलाची दारू गाळली जात असल्याची माहिती मिळताच अहिंसक कृतीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार गाव संघटन व मुक्तिपथ तालुका चमूने शेतशिवारात शोधमोहीम राबविली असता, जवळपास १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल मिळून आला. यामध्ये सहा क्विंटल मोहफुलाचा सडवा, दारू काढण्याचे साहित्य १२ नग व ड्रमचा समावेश आहे. यावेळी संपूर्ण मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here