THE गडविश्व
मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी यामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतातही पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली आहे. मात्र आता Omicron नावाच्या कोरोनाच्या व्हेरिएन्टने जगभरातील लोकांमध्ये पुन्हा दहशत निर्माण केली आहे. भारतात तिसरी लाट आली आहे अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यात आता राज्यातील बहुतांश मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारीही वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात आज पुन्हा निर्बंध लावण्यात येणार की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी तीन दिवसांवर पोहोचला आहे. म्हणूनच काल मुंबई, पूण्यासह राज्यभरात पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पार्श्वभूमीवर आता राज्यातील कॉलेजसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला आहे. यात उदय सामंत यांनी रुजतील कॉलेजेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु राहणार की बंद या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे.
महाविद्यालयासंदर्भात हा निर्णय
राज्यातील अकृषी आणि तंत्रनिकेतन कॉलेजेस हे येत्या 15 फ्रेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व कॉलेजेससाभ्य परीक्षा या ओंलीण पद्धतीनं घेण्यात येणार आहेत. सर्व विद्यापीठांनी तशी मान्यता दिली आहे. जळगाव, नांदेड अशा जिल्ह्यांमधील कनेक्टिव्हिटीचा प्राब्लेम बघता या जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यापीठांना हेल्पलाईन सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व वसतिगृह बंद करण्यात आले आहेत. परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बंद करण्यात येणार नाहीत.