– १४ रक्तदात्यांचा रक्तदानास पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात म.रा. लिपिक संवर्ग संघटना, कृषी पर्यवेक्षक संघटना, कृषी सहायक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानातून १४ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा बघता रक्तदान हेच श्रेष्ठदान ही भावना लक्षात घेऊन १४ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
यात मा.जि.अ.कृ.अ. बसवराज मासोळी, तंत्र अधिकारी गणेश बदाडे, कृषी पर्यवेक्षक विजय पत्रे, वरिष्ठ लिपिक मोतीराम चौधरी, वरिष्ठ लिपिक मंगेश धवने, शिपाई श्रीनिवास धोटे, कृषी सहायक संतोष चलाख, कृषी सहायक प्रकाश निंबार्ते, अभिजित वाघमारे, रेवाराम भेंडारकर, अनुप भोयर, विश्वानंद पुण्यपवार, भीमराव गोंडाने, लिपिक राहुल गजभिये यांनी रक्तदान केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश देशमुख, गिरीश बोबडे, विजय पत्रे, प्रशांत मते यांनी विशेष भूमिका बजावली.
यावेळी रक्तपेढीतील डॉक्टर, नर्सेस आदींनी विशेष सहकार्य केले.