The गडविश्व
सावली : तालुक्यातील हरांबा येथील अनिल गणपती कूनघाडकर यांच्या गोठ्यात बांधून असलेल्या म्हशी ला विषारी सापाने चावा घेतल्याने त्या म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना म्हस मालकाला सकाळी उठल्या नंतर माहिती पडली.
प्राप्त माहितीनुसार, हरांबा येथील अनिल गणपती कूनघाडकर यांची म्हस गोठ्यात बांधून होती. आज सकाळच्या सुमारास कूनघाडकर हे गोठ्याकडे गेले असता म्हस मृतावस्थेत आढळून आली. दरम्यान म्हशीची चौकशी केली असता पायाला सापाने दंश केलेले आढळून आले. सदर म्हशीचा मृत्यू झाल्याने कुनघाडकर यांचे २० ते २५ हजारांचे नुकसान झाले आहे.