धक्कादायक : अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला, शेतकऱ्यासह अस्वलाचा मृत्यू

813

The गडविश्व
गडचिरोली : अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला केल्याने शेतकऱ्याने स्वतःचे प्राण वाचविण्याकरीता अस्वलावर कुऱ्हाडीने प्रतिकार केला असता यात शेतकऱ्यासह अस्वलाचाही मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील एटापल्ली वनपरिक्षेत्रातील देवदा बिट हद्दीतील बटेर येथे बुधवारी घडली. सम्मा होडपे दुग्गा (५५) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सम्मा दुग्गा हे शेतात बकऱ्या व जनावरे चरायला गेले असता या दरम्यान अस्वलाने सम्मा यांच्यावर हल्ला केला. सम्मा यांनी स्वतःचे प्राण वाचविण्याकरिता स्वतःजवळ असलेल्या कुऱ्हाडीने अस्वलाचा प्रतिकार केला. या झटापटीत अस्वल आणि शेतकरी सम्मा दोघांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती माहिती गुरुवारी सकाळी १० वाजतापर्यंत गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले नव्हते. घटनेची माहिती वनपरिक्षेत्राधीकारी प्रकाश झाडे यांना मिळताच त्यांनी वनकर्मचाऱ्यांना घटनेची माहिती घेण्याकरिता बटेर गावात पाठवल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here