गडचिरोली जिल्ह्यात आज आढळले १० नवे कोरोना बाधित तर ८ कोरोनामुक्त

185

The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यात आज ७६८ कोरोना तपासण्या करण्यात आल्या त्यापैकी १० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून ८ जण कोरोनमुक्त झाले आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३७५०१ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ३६६९९ आहे. तसेच आता सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या २९ झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ७७३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८६ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.०८ टक्के तर मृत्यू दर २.०६ टक्के झाला आहे.
आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील ०४,अहेरी तालुक्यातील ०१,भामरागड तालुक्यातील ०१, चामोर्शी तालुक्यातील ०१,एटापल्ली तालुक्यातील ०१, कुरखेडा तालुक्यातील ०२ जणाचा समावेश आहे.तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ०२,चामोर्शी तालुक्यातील ०१,धानोरा तालुक्यातील ०१,कुरखेडा तालुक्यातील ०४ जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here