कुरखेडा नगर पंचायतीचा लिपिक अडकला एसीबीच्या जाळ्यात

658

– ५ हजारांची स्विकारली लाच

The गडविश्व
गडचिरोली : सीसी रोड व मंदिराचे सौंदर्यीकरण कामाचे थर्ड पार्टीचे बिल मंजूर करून काढून देण्याकरिता ५ हजार ४०० रुपयांच्या लाच रकमेची मागणी करून ताडजोडीअंती ५ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना कुरखेडा नगर पंचायत मधील लिपिक देविदास मूखरु देशमुख (४५) ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांना सीसी रोड व मंदिराचे सौंदर्यीकरण कामाचे थर्ड पार्टीचे बिल मंजूर करावयाचे होते याकरिता लिपिक देशमुख यांच्याकडे गेले असता देशमुख यांनी सदर काम करून देण्याकरिता ५ हजार ४०० रुपयांची मागणी केली. मात्र तक्रादार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला असता  तक्रादार यांचे काम करून देण्याकरिता ५ हजार ४०० रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती नगर पंचायत कार्यालय कुरखेडा येथे ५ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लिपिक देविदास मुखरू देशमुख ला आज २८ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलीस स्टेशन कुरखेडा येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, स.फौ ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, पो.ना राजेश पदमगिरवार, पो.ना.श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप उडाण, चापोहवा तुळशीराम नवघरे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here