– वेलगुर येथील माता मंदिरमध्ये हातपंपाची झाली सोय
The गडविश्व
अहेरी २ जुलै : तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय वेलगुर येथील माता मंदिरामध्ये जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत नवीन हातपंप मंजूर झाले. आज
शनिवारी सदर हातपंपाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीताताई चालूरकर, वेलगुर ग्रामपंचायत सरपंच किशोर आत्राम, उमेश भाऊ मोहुर्ले उपसरपंच ग्रामपंचायत वेलगूर, कीष्टापूर ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच अशोक येलमुले, ग्रामपंचायत सदस्य करपेत ताई, तलांडे ताई, सडमेक ताई, नरेश मडावी, सुरेश येरमे, बंडू सिडाम, यास्वंत सिडाम, राजू येरमे, सुरेखाताई येरमे, किशोर करपेत, करपेत काकू, विनोद तलांडे, अनिल आदी,तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.