THE गडविश्व
कोरची : येथील विदर्भ पटवारी संघातर्फे तलाठ्यांचे सेवाविषयक मागण्यांच्या निपटारा संदर्भात उपविभाग तथा तालुकास्तरावर विविध टप्प्यांमध्ये आंदोलन सुरू झाले आहे . 17 डिसेंबर 2021 रोजी जिल्ह्यातील तलाठी तालुका कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. 23 डिसेंबर 2021 रोजी सर्व तलाठ्यांनी आपल्या डीएससी तहसील कार्यालयात जमा केल्यात व 24 डिसेंबर 2021 ला जिल्हा अधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली . परंतु तलाठ्यांच्या प्रलंबित मागण्या बाबत अंतिम तोडगा न निघाल्यामुळे 27 डिसेंबर 2021 पासून कोरचीचे तहसीलदार छगन लाल भंडारी यांना निवेदन देऊन तालुक्यातील सर्व तलाठी बेमुदत सामूहिक रजेवर जाऊन आंदोलनाला सुरुवात केलेली आहे . या आंदोलनात विदर्भ पटवारी संघ नागपूर शाखा कोरचीचे अनेक तलाठी सहभागी झाले आहेत.