– आरोपीचे पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण
The गडविश्व
गडचिरोली, ६ जुलै : शहरापासून जवळच असलेल्या पुलखल येथे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर फावड्याने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवार ५ जुलै रोजी घडली. हत्येनंतर आरोपीने पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. कैलास मेश्राम (३२)असे मृतकाचे नाव आहे तर नरेश गेडेकर (३३) असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पुलखल येथील कैलास मेश्राम आणि नरेश गेडेकर यांच्यामध्ये शेतात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले दरम्यान नरेश गेडकर ने हातात असलेल्या फावड्याने कैलास च्या डोक्यावर वार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर नरेश गेडेकर याने स्वतः पोलीस स्टेशन गाठून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.