The गडविश्व
नवी दिल्ली, ६ जुलै : देशात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला असून नागरिकांच्या खिशाला अधिकची कात्री बसणार आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात थेट ५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजीच्या दरात वाढ केली आहे.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आल्याने आता गृहिणींच्या बजेवट याचा परिणाम होणार आहे. यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत १४ .२ किलोच्या सिलिंडरची किंमत १०५३ रुपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईतही सिलिंडर १०५३ रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या महिन्यात १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ३.५ रुपयांनी वाढली होती. त्यामुळे एका सिलिंडरची किंमत १,००३ रुपये झाली होती. पूर्वी ती ९९९.५० रुपये होती. सिलिंडर एक हजार रुपायांच्या पार गेल्यानंतर ही थेट ५० रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.