मुलींच्या शारिरीक सुदृढते इतकेच मानसिक आरोग्यही महत्वाचे : डॉ. सविता सादमवार

249

The गडविश्व
गडचिरोली, ६ जुलै : किशोरवयीन मुलींशी शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची जपणूक कशी करावी , बदलत्या परिस्थितीत मुलींनी त्यांचे आत्मबळ वाढवावे, सृजनशीलतेवर भर द्यावा असे प्रतिपादन दिशा मानव विकास आणि संशोधन संस्था गडचिरोलीच्या अध्यक्षा डॉ. सविता सादमवार यांनी जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येणापूर यांच्या वतीने शिवाजी हायस्कूल गोकुळ नगर गडचिरोली येथे मंगळवार ५ जुलै २०२२ रोजी “किशोरवयीन मुलीच्या आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडले यावेळी मार्गदर्शन करतांना केले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून येथील डॉ. सविता सादमवार, लेखक, समुपदेशक, अध्यक्ष दिशा मानव विकास आणि संशोधन संस्था गडचिरोली तथा अध्यक्ष पणती महिला संघटन गडचिरोली यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र हिवरकर प्रभारी मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल गडचिरोली, तसेच प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी हायस्कूल येथील शिक्षिका चेतना निनावे, स्वाती वासेकर व विद्यार्थिनी उपस्थिती होत्या.
किशोरवयीन मुलींशी शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची जपणूक कशी करावी यावर संवाद साधला. बदलत्या परिस्थितीत मुलींनी त्यांचे आत्मबळ वाढवावे, सृजनशीलतेवर भर द्यावा, याबाबत सविस्तर माहिती दिली. बालकांचे अधिकार व कायदे याविषयी महिती दिली. कोणती दुर्घटना या काळात स्वतः सोबत किंवा परिसरातील कोणत्याही बालकासोबत सोबत घडली तर त्यावर मात करण्यासाठी काय उपाय करावे कुठे तक्रार नोंद करायची याबाबत अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे किशोरवयीन काळ हा विद्यार्थीनीच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो या काळात कोणती काळजी जास्त घेतली पाहिजे याबद्दल सुद्धा माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन कु. पल्लवी मंगर फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय गडचिरोली यांनी केले तर प्रास्ताविक जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येणापुर चे सचिव लुकेश सोमनकर, आभार कु. वैशाली गेडाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रविंद्र बंडावार, पल्लवी कुनघाडकर तसेच शिवाजी शाळेतील प्राचार्य व शिक्षकांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here